जयमाला शिलेदार यांचा गौरव

June 9, 2010 11:15 AM0 commentsViews: 82

9 जून

मराठी संगीत रंगभूमीवरच्या जेष्ठ अभिनेत्री आणि गायिका जयमाला शिलेदार यांना बी. वाय. पाध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जाहिरात क्षेत्रातील मोठे नाव म्हणजे बी. वाय. पाध्ये. गेल्या 2 वर्षांपासून कलाक्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या कलाकारांना पाध्ये कुटुंबीयांतर्फे सन्मानित केले जात आहे.

या वर्षी हा सन्मान जयमालादीदींना दिला गेला आहे. 1 लाख रूपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

close