भोपाळ दुर्घटना कारवाईबाबत गोंधळ सुरूच

June 9, 2010 11:24 AM0 commentsViews: 82

9 जून

भोपाळ गॅस दुर्घटनेनंतरच्या 26 वर्षांनंतरही सरकार अजूनही कारवाईच्या गोंधळात अडकले आहे.

या दुर्घटनेतील भरपाई आणि पर्यावरणाच्या हानीच्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी सरकारने मंत्रिगटाची नेमणूक केली आहे.केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम हे या समितीचे अध्यक्ष असतील.

वॉरेन अँडरसनचा ताबा मिळवण्याबाबत ही समिती चर्चा करेल. आणि पीडितांच्या नुकसान भरपाईचाही फेरआढावा घेईल.

दोषींना अजून कडक शिक्षा देता येऊ शकते का, याचाही समिती विचार करेल.

close