हिरो होंडांच्या नव्या बाईक्स लॉन्च

October 20, 2008 3:41 PM0 commentsViews: 126

20 ऑक्टोबर, मुंबईसणांच्या दिवसांचा फायदा घेण्यासाठी हीरो होंडा लवकरच बाईक्सची नवी चार मॉडेल्स लॉन्च करणार आहे. यातली एक स्कूटरेट आहे. पॉवर स्टार्ट असणार्‍या या सर्व मॉडेल्सचं बुकिंगही सुरू झालंय. या बाईक्सची किंमत 44 हजार रुपयांपासून सुरू होत असून या 100सीसी च्या बाईक्स आहेत. हिरो होंडानं स्प्लेंण्डर एनएक्सजीचं नवं व्हर्जन लॉन्च केलं आहे. ही देखील 100 सीसी ची बाईक असून सेल्फ स्टार्ट फिचर्स असलेली ही बाईक सात रंगामध्ये उपलब्ध आहे. कंपनीनं 150सीसीच्या सीबीजी एक्स्ट्रीमचंही नवं मॉडेल मार्केटमध्ये उतरवलं आहे. कंपनीनं प्लेजर या स्कूटरेटच्या रंग आणि डिझाईनमध्ये कॉलेज तरुणांना आवडतील, असे काही बदल केलेत.

close