मडगाव स्फोटातील आरोपीची शरणागती

June 9, 2010 11:41 AM0 commentsViews: 1

9 जून

मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील पाच आरोपींपैकी एकाने आज गोव्याच्या कोर्टात शरणागती पत्करली.

दिवाळीत मडगावमध्ये हा बॉम्बस्फोट झाला होता. प्रशांत अष्टेकर हा आरोपी या स्फोटप्रकरणी फरार होता. प्रशांत रत्नागिरीचा रहिवाशी आहे.मडगावात स्फोटाच्या कटात सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

एनआयए म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेटींग एजन्सी सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. एनआयएने यापूर्वी प्रशांतचा भाऊ धनंजयला या प्रकरणी अटक केली होती.

आता प्रशांतच्या चौकशीत या प्रकरणातील नवनवीन गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

close