शिवाजी पार्कवरील पदपथाला परवानगी

June 9, 2010 12:03 PM0 commentsViews: 6

9 जून

शिवाजी पार्कवरील पदपथाचे बांधकाम करण्याची परवानगी हायकोर्टाने दिली आहे. काही महिन्यांपूर्वी मनपाने शिवाजी पार्कचे सुशोभीकरण करण्याचे जाहीर केले होते.

मात्र शिवाजी पार्कमधील लोकांनी या सुशोभिकरणाला तीव्र विरोध केला होता. तसेच या विरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सुशोभिकरणाच्या कामास कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली होती.

सुशोभिकरणाच्या कामासाठी शिवाजी पार्कजवळचे रस्तेही खोदण्यात आले होते. खोदलेले रस्ते दुरुस्त करून नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी विनंती मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी कोर्टाला केली होती.

न्यायमूर्ती रिबेलो यांनी ही विनंती मान्य करून शिवाजी पार्क येथील रस्त्यांच्या दुरुस्तीस परवानगी दिली.

close