त्र्यंबकेश्वरमध्येही युतीत काडीमोड

June 9, 2010 1:14 PM0 commentsViews: 1

9 जून

औरंगाबादनंतर आता त्र्यंबकेश्वरमध्येही युतीचा संसार तुटला आहे. पण इथे निमित्त झाले ते सेनेच्या नगरसेवकांनी काँग्रेसोबत हातमिळवणी करण्याचे.

येत्या 15 जूनला त्र्यंबकेश्वरमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे. या ठिकाणी भाजप 4, सेना 2, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1 आणि इतर अपक्ष असे बलाबल आहे.

अपक्षांच्या मदतीने भाजपचे पारडे जड होते. मात्र, अचानक शिवसेनेच्या नगरसेविका आशा लोखंडे आणि लक्ष्मी पवार यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेससोबत हातमिळवणी केली.

त्यामुळे भाजपच्या हातून नगराध्यक्षपद निसटण्याची वेळ आली आहे.

युतीचा धर्म मोडल्याने हा वाद थेट मातोश्रीवर पोहोचला आहे. मात्र, सेनेच्या नाशिक जिल्हा नेत्यांच्या आशीर्वादानेच हे झाल्याची चर्चा आहे.

close