वाशीमध्ये टिळक विद्यालयाची मनमानी

June 9, 2010 1:28 PM0 commentsViews:

अलका धुपकर, मुंबई

9 जून

देशभरात यंदापासून शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आला आहे. पण दुसरीकडे खाजगी शाळा मनमानी करुन विद्यार्थ्यांना सक्तीने शाळेतून काढून टाकत आहेत.

सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे, ज्या पालकांनी शाळेतील गैरकारभाराविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवला त्यांच्याच मुलांवर शाळा सोडण्याची वेळ खाजगी शाळांनी आणली आहे.

ही गळचेपी उघड करण्याची मोहीम 'आयबीएन-लोकमत'ने हाती घेतली आहे.

वाशीतील टिळक विद्यालयातील आठ वर्षांची मानसी म्हात्रे गेले वर्षभर शाळेत गेलेलीच नाही. तिचा दुसरीचा रिझल्ट दिलेला नाही. लिव्हींग सर्टिफिकेट घ्या..शाळा सोडा आ

णि निकाल घेऊन जा, अशी अरेरावीच शाळेने केली आहे. कारण शाळेच्या फी वाढीविरोधात तिच्या पालकांनी केलेले आंदोलन…मानसीच्या पालकांनी जेव्हा तिला शाळेतून काढायला नकार दिला, तेव्हा तर शाळेने हद्दच केली. पोस्टाने तिचे लिव्हींग सर्टिफिकेट घरी पाठवले.

टिळक विद्यालयाच्या विरोधात म्हात्रे यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी, शिक्षणमंडळाचे संचालक, उपसंचालक, नवी मुंबई शिक्षणमंडळ या सर्वांकडे तक्रारी केल्या. पण कुणाच्याच आदेशाचे पालन टिळक विद्यालय करत नाही.

शिक्षणाचा हक्क डावलणार्‍या या शाळेची मान्यता शिक्षणमंत्री काढणार का? हा खरा प्रश्न आहे.

close