उद्यापासून राष्ट्रपती जळगाव दौर्‍यावर

June 9, 2010 1:46 PM0 commentsViews: 2

9 जून

राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा 4 दिवसांचा जळगाव दौरा निश्चित झाला आहे. उद्यापासून त्यांच्या दौर्‍याला सुरुवात होणार आहे.या दौर्‍यात बोदवड उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते केले जाणार आहे.

गेल्या 21 वर्षांपासून बोदवड उपसा जलसिंचन योजना फक्त कागदावरच होती. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे माहेर असल्याने तब्बल 21 वर्षाने का होईना, या योजनेला चालना मिळणार आहे.

तापी नदीच्या पाण्याचा वापर करून जळगाव आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांतील 42 हजार हेक्टर कोरडवाहू शेतजमिनीला या योजनेच्या माध्यमातून पाणी मिळणार आहे.

तापी पाटबंधारेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण झाला, तर या भागातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

close