कुर्ल्यातून आणखी मुलगी बेपत्ता

June 9, 2010 1:55 PM0 commentsViews: 5

9 जून

कुर्ला नेहरूनगर भागातून पुन्हा एकदा एक अल्पवयीन मुलगी आश्चर्यकारकरित्या गायब झाली आहे. नुसरत शेख असे या मुलीचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून तिचा काहीच थांगपत्ता लागत नाही.

गेल्या तीन महिन्यांतील ही चौथी घटना आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे या घटनांमध्ये आजपर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

त्यामुळे नागरिकही संतापले आहेत. काही दिवसांपूर्वी याच भागात पोलीस वसाहतीच्या गच्चीवर एका 9 वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचे उघड झाले होते.

close