स्लॅब कोसळून मुलीचा मृत्यू

June 9, 2010 2:01 PM0 commentsViews: 2

9 जून

मुंबईतील गोरेगावात भरत भुवन या इमारतीचा काही भाग कोसळून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. फागुन गोयल ही सहा वर्षांची मुलगी घरात झोपली होती, त्याच वेळी हा स्लॅब कोसळला.

भरत भुवन ही चार मजली इमारत 50 वर्षे जुनी आहे. गोयल कुटुंब तिसर्‍या मजल्यावरील घरात भाड्याने राहत होते.

घराच्या मालकाने घराची डागडुजी केली नसल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

close