अँडरसनचा ठपका अर्जुन सिंगांवर

June 9, 2010 3:39 PM0 commentsViews: 2

9 जून

भोपाळमध्ये युनियन कार्बाईड कंपनीतून विषारी वायूची गळती होऊन हजारो लोकांचा मृत्यू झाला. हा घटनेला जबाबदार असणारा कंपनीचा प्रमुख वॉरन अंडरसन भारताबाहेर पळून गेला. तो अजूनही सापडलेला नाही…

पण या अँडरसनला भारताबाहेर पळ काढायला तेव्हाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांनी मदत केली, असा खळबळजनक आरोप भोपाळच्या तत्कालीन कलेक्टरने केला आहे.

दोन डिसेंबर 1984 ची मध्यरात्र…भोपाळच्या युनियन कार्बाईड कंपनीतून विषारी वायूची गळती होऊन.. पंधरा हजार लोकांचा मृत्यू झाला सात डिसेंबर 1984.. युनियन कार्बाईडचा प्रमुख वॉरेन अँडरसन भारतात आला.. त्याला पोलिसांनी अटक करून कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवले…

पण काही तासांतच त्याची जामिनावर सुटका झाली… त्याला तातडीने भोपाळहून दिल्लीला नेण्यात आले… आणि त्याच रात्री तो अमेरिकेसाठी रवाना झाला… आणि परत आलाच नाही…

काही तास चाललेल्या या नाट्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यावर पहिल्यांदाच प्रकाश टाकला तो भोपाळचे तत्कालीन कलेक्टर मोती सिंग यांनी. ते म्हणतात की तेव्हाच्या मध्य प्रदेशच्या मुख्य सचिवांच्या आदेशावरून अँडरसनला जामीन देण्यात आला .. आणि सरकारी विमानातूनच दिल्लीला जाण्याची परवानगीही…

84 साली… काँग्रेसचे अर्जुन सिंग तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी नुकतेच पंतप्रधान बनले होते. भोपाळ दुर्घटनेचे वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार राजकुमार केसवानी म्हणतात की अर्जुन सिंग यांनी दिल्लीहून आलेल्या एका कॉलनंतर अँडरसनला सरकारी विमान वापरून दिल्लीपर्यंत जाण्याची परवानगी दिली…

आता ऐंशी वर्षांचे असलेले अर्जुन सिंग या विषयावर बोलायला तयार नाहीत. त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले कॅप्टन जयपाल सिंग म्हणतात की त्यांना 25 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आता आठवत नाहीत…

25 वर्षांपूर्वी निर्णय प्रक्रियेत असलेले अनेक अधिकारी सध्या हयात नाहीत. आणि जे आहेत ते बोलणे टाळत आहेत. त्यामुळे अँडरसनला भारताबाहेर जाण्यास कुणी मदत केली, या प्रश्नाचे ठोस उत्तर मिळत नाही.

close