विक्रोळी रेल्वे स्टेशनवर संशयास्पद बॅग

June 9, 2010 5:24 PM0 commentsViews: 4

9 जून

आज ऐन संध्याकाळी मध्य रेल्वेची स्लो मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कारण होते, एक संशयास्पद बॅग…

विक्रोळी रेल्वे स्टेशनमध्ये एक संशयास्पद बॅग सापडली. ही बॅग स्लो ट्रॅकच्या बाजूला पडलेली होती.

पोलिसांच्या डॉग स्कॉडने तपास केल्यावर बॉम्ब डिटेक्टर स्कॉडला बोलावण्यात आले. त्यानंतर बॉम्ब स्कॉडने बॅग सुरक्षित स्थळी नेऊन तिची तपासणी केली. त्यात चाव्या आणि पेपर सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पण या सर्व प्रकारात त्रास झाला तो रेल्वे प्रवाशांना. कारण स्लो ट्रॅकवरची वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्याने प्रवाशांना बराच वेळ खोळंबून रहावे लागले.

close