युवीचे करिअर धोक्यात

June 9, 2010 5:34 PM0 commentsViews: 1

9 जून

भारताचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंगला एशिया कप स्पर्धेसाठी डच्चू देण्यात आला आहे. युवराज सिंगला आयपीएल स्पर्धेमध्ये समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. तर टी-20 वर्ल्ड कपमध्येही तो सपशेल फ्लॉप ठरला होता.

पण यामुळे युवराज सिंगचे क्रिकेट करिअर मात्र धोक्यात आले आहे.

2011मध्ये होणार्‍या वर्ल्डकपच्या दृष्टीने भारतीय टीमची बांधणी सुरू आहे. आणि युवा खेळाडूंमध्येही टीममध्ये जागा पटकावण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

अशातच युवराजच्या कामगिरीसोबतच फिटनेसचा फटकाही त्याला बसत आहे. युवराज सिंगचा फिटनेस हा सध्याच्या भारतीय क्रिकेटमधला वादग्रस्त मुद्दा ठरला आहे.

close