हज यात्रेसाठी मराठवाड्यातून गर्दी

June 9, 2010 6:00 PM0 commentsViews: 2

9 जून

ऑक्टोबर महिन्यापासून हज यात्रेला सुरुवात होते. मराठवाड्यातून या वर्षी 2 हजार 63 तर राज्यातून एकूण 8 हजार 831 यात्रेकरू जाणार आहेत.

हज यात्रेला जाण्यासाठी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांतील 8 हजार 221 भाविकांनी मुंबई इथे महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या कार्यालयात अर्ज केले होते. त्यापैकी सोडत पध्दतीने 2 हजार 63 भाविकांना हज यात्रेला जाता येणार आहे. तर प्रतीक्षा यादीत 77 भाविकांचा समावेश आहे.

तसेच सतत सलग तीन वर्षे अर्ज करणार्‍या 271 भाविकांनाही यात्रेसाठी संधी मिळाली आहे. ज्यांचा नंबर लागला, त्यांना अर्ज आणि पासपोर्ट 4 जुलैपर्यंत हज कमिटीकडे पाठवावा लागणार आहे.

close