अखेर गिडवाणींची माघार

June 10, 2010 7:44 AM0 commentsViews: 1

10 जून

अखेर ऐन मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे कन्हैयालाल गिडवाणी यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मार्ग निर्धोक झाला आहे.

उमेदवारी मागे घेण्यास कन्हैयालाल गिडवाणी यांनी ठाम नकार दिला होता. त्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गिडवाणी यांची समजूत काढत होते.

दरम्यान गिडवाणींची उमेदवारी मागे घ्या, अन्यथा राष्ट्रवादीची दुसर्‍या पसंतीची मते काँग्रेसला मिळणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला होता.

शेवटी राष्ट्रवादीच्या या दबावापुढे काँग्रेस झुकले आणि गिडवाणी यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. गिडवाणी हे नारायण राणे यांच्या निकटचे मानले जातात. त्यामुळे यातही मुख्यमंत्र्यांच्या गटाने बाजी मारल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांनी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर गिडवाणींच्या माघारीची जबाबदारी दिली होती.

आज विधानपरिषदेचे मतदान होत असतानाच गिडवाणींना राज्यसभेच्या उमेदवारीपासून माघार घ्यावी लागली आहे.

close