बागवानच्या जामिनावर सुनावणी 14 रोजी

June 10, 2010 9:29 AM0 commentsViews: 5

10 जून

मिरज दंगलीतील मुख्य आरोपी मैनुद्दीन बागवानच्या अटकपूर्व जामिनावर आता 14 जूनला सुनावणी होणार आहे.

सरकारी वकिलांनी आपले म्हणणे मांडण्यास वेळ मागितली आहे. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

मिरज दंगलीला माजी महापौर मैनुद्दीन बागवान आणि शिवेसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी जबाबदार आहेत, असा गौप्यस्फोट सांगलीचे एसपी कृष्णप्रकाश यांनी सोमवारी केला होता.

दंगलीतील फरार आरोपी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान तीन दिवसांपूर्वीच ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना भेटून गेल्याचेही स्पष्ट झाले होते.

त्यानंतर आता बागवानच्या चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीत बागवान दोषी आढळला, तर त्याच्यावर कठोर कारवाई करू, असे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहे.

close