नागपूरमध्ये सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी घराबाहेर

October 20, 2008 4:11 PM0 commentsViews: 4

20 ऑक्टोबर, हिंगोलीनागपूरमध्ये राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना ऐन दिवाळीतच घरं खाली करण्याची वेळ आली आहे. सिव्हिल लाईन्समधली विधानमंडळ कर्मचारी वसाहतींना नोटिस बजावल्या आहेत. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन जवळ आल्यामुळे इथल्या रहिवाशांना क्वाटर्स खाली करण्यास सांगितलं आहे. या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना दरवर्षी दुसर्‍या घरात दिवाळी साजरी करावी लागते.अधिवेशनाच्या एक महिना अगोदर क्वॉर्टर खाली करण्याची नोटिस मिळते. आणि काही दिवसांसाठी दुसरी जागा दिली जाते. पण ती जागा राहण्यासाठी योग्य नसते. या क्वार्टर्समध्येे द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे कर्मचारी राहतात. पण या सगळ्यांनाच क्वार्टर मिळत नाही. जो वरिष्ठ असेल त्याला पर्यायी व्यवस्था मिळते. इतरांना मात्र स्वत:च व्यवस्था करावी लागते. अधिवेशच्या वेळेस दोन महिन्यांसाठी क्वॉर्टर खाली करायचं आणि पर्यायी व्यवस्था केली जाणार नाही, असा शासनाचा नियम आहे.पण फक्त महिनाभर आधी नोटिस दिल्यानं कर्मचार्‍यांवर घराबाहेर दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे.

close