गिडवाणींच्या माघारीमुळे राज्यसभा बिनविरोध

June 10, 2010 9:41 AM0 commentsViews: 5

10 जून

राज्यसभेच्या निवडणुकीतून कन्हैय्यालाल गिडवाणी यांनी माघार घेतल्याने राज्यसभेच्या सहाही उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे.

यात काँग्रेसचे विजय दर्डा, अविनाश पांडे, राष्ट्रवादीचे ईश्वरलाल जैन, तारिक अन्वर, शिवसेनेचे संजय राऊत आणि भाजपचे पियुष गोयल यांचा समावेश आहे.

कन्हैय्यालाल गिडवाणी यांनी विधान परिषदेसाठीही अपक्ष म्हणून अर्ज भरून माघार घेतली होती. तर राज्यसभेतूनही त्यांना माघार घेण्यास पक्षाने भाग पाडले आहे

close