पाशेको यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

June 10, 2010 9:55 AM0 commentsViews: 2

10 जून

गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आला आहे. गोव्यातील नादिया टोरॅडो हत्या प्रकरणातील ते मुख्य आरोपी आहेत.

अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्याने त्यांना आता अटक होऊ शकते.

दरम्यान या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. पोलिसांनी दबाव आणून मिकी पाशेकोचे नाव घ्यायला लावले, असा दावा मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

पण नादियाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

close