विजय सावंत विजयी

June 10, 2010 2:41 PM0 commentsViews: 4

10 जून

अखेर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार विजय सावंत यांचा विजय झाला आहे. सुरुवातीच्या फेरीत केवळ 13 मते मिळालेल्या सावंतांना पाचव्या फेरीत तब्बल 34 मते मिळाली. आणि त्यांचा सहज विजय झाला.

सुरुवातीला सावंत यांच्या पराभवाच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यांना नंतर अधिकृत विजयी म्हणून घोषित करण्यात आले. सावंत यांचा विजय हा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा विजय मानला जात आहे.

याशिवाय मनसेची मते काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पारड्यात पडल्याचे सष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही याला दुजोरा दिला आहे.

काँग्रेस आघाडीला मते दिल्याने मनसे आणि सेनेत आता पुन्हा एकदा वाद उफाळून येणार आहे.

शेवटच्या फेरीत आता भाजपच्या शोभा फडणवीस आणि शिवसेनेचे अनिल परब यांच्यात शर्यत सुरू आहे. शोभा फडणवीस परब यांच्यापेक्षा 4 मतांनी मागे आहेत.

close