दिग्विजय यांचे राजीव गांधीवर आरोप

June 10, 2010 3:34 PM0 commentsViews: 3

10 जून

अँडरसनच्या सुटकेवरून आता काँग्रेसमध्येच चिखलफेक सुरू आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आता एक नवा वाद निर्माण केला आहे.

अँडरसनच्या सुटके प्रकरणी त्यांनी थेट तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आरोप केलेत. तर त्या वेळचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांची त्यांनी पाठराखण केली आहे.

राज्य सरकारला या प्रकरणात काही करण्याची संधीच नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारने दिलेले आदेश पाळणे, एवढेच राज्य सरकारच्या हातात होते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अँडरसनच्या सुटकेत अमेरिकेचा दबाव हा एक महत्त्वाचा घटक असावा, असा आरोपही त्यांनी केला आहे. तर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि अमेरिका या तिघांच्या संगनमताने अँडरसनची सुटका झाली, असा आरोप तत्कालीन केंद्रीय रसायन मंत्री वसंत साठे यांनी केला आहे

close