परब पराभूत, सावंत विजयी

June 10, 2010 4:06 PM0 commentsViews: 1

10 जून

विधान परिषदेच्या निवडणुकीत अखेर शिवसेनेला धक्का बसला. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू उमेदवार अनिल परब यांचा पराभव झाला.

मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मते देणार, ही बातमी 'आयबीएन-लोकमत'ने कालच दिली होती. ही बातमी खरी ठरली.

मनसेच्या मतांचा फायदा काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार विजय सावंत यांना झाला आणि पाचव्या फेरीअखेर ते विजयी झाले. त्यांना तब्ब्ल 34 मते मिळाली.

विजय सावंत यांना पहिल्या फेरीत 13 मते मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या पराभवाच्या बातम्या आल्या होत्या. पण पाचव्या फेरीअखेर मात्र त्यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले.

शिवसेनेचे अनिल परब अंतिम फेरीत दीड मतांनी पराभूत झालेत. विजय सावंत यांची उमेदवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती.

close