पराभवाचे खापर मनसेवर

June 11, 2010 9:49 AM0 commentsViews:

11 जून

विधानपरिषद निवडणुकीतील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. यावेळीही शिवसेनेने पराभवाचे खापर फोडले आहे, ते मनसेवर.

आजच्या 'सामना'मधून मनसेवर टीका करण्यात आली आहे. 'मनसे की धनसे' या शब्दात ही टीका करण्यात आली आहे.

तसेच 'लोकशाही हरली, थैलीशाही जिंकली' असे वर्णन सामनातून करण्यात आले आहे.

शिवसेनेचे दिवाकर रावते विधानपरिषदेवर निवडून आले. पण अनिल परब यांना पराभव स्वीकारावा लागला. उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला. मते विकत घेण्यात आली, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

close