मुंडेंची संघविरोधी भूमिका

June 11, 2010 10:49 AM0 commentsViews: 4

11 जून

ओबीसींच्या जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला आहे. तसेच भारतीय जनता पक्षानेही या संदर्भातील आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. असे असतानाही भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींची जनगणना नाकारणे म्हणजे त्यांना न्याय नाकारणे, असे जाहीर मत व्यक्त केले आहे.

त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दलितांना, ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून गुणवत्तेचा खोटा प्रचार केला जात आहे, असे म्हणणारे लोक मला मनूच वाटतात. मी मनूसमर्थक नाही. माझ्या महाविद्यालयीन दिवसात मी मनुस्मृती जाळली होती, असे म्हणत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना चपराक लगावली आहे.

close