पुण्यातील कचर्‍याला पुन्हा विरोध

June 11, 2010 12:49 PM0 commentsViews: 2

11 जून

पुणे शहरातील कचर्‍याचा प्रश्न आता आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

संभाजी महाराजांची समाधीस्थळ असलेल्या वडू तुळापूर परिसरात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा पुणे महापालिकेचा प्रस्ताव आहे. या परिसरात असा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. या प्रकल्पाला गावकर्‍यांचा विरोध आहे.

पवारांच्या अनेक जागा आहेत, तिथे ही घाण किंवा कचरा टाका, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना यानिमित्ताने लगावला.

वढू इथे प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उदयनराजे बोलत होते.

close