बीएआरसीतील मृत्यूंचे प्रमाण वाढले

June 11, 2010 12:56 PM0 commentsViews: 5

11 जून

देशातील एकमेव अणू संशोधन केंद्र असणार्‍या बीएआरसीतील शास्त्रज्ञ आणि अधिकार्‍यांच्या आकस्मिक मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. माहितीच्या अधिकाराखाली ही बाब पुढे आली आहे.

गेल्या 10 वर्षांत बीएआरसीतील 10 कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी तीन आत्महत्या या वर्षातच झाल्या आहेत.

तर गेल्या 15 वर्षांत 157 जणांचा कर्करोगाने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे बीएआरसीमध्ये काम करणार्‍या अधिकार्‍यांच्या आणि शास्त्रज्ञांच्या आरोग्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

बीएआरसीमधील लोकांचा मृत्यू त्याठिकाणी असणार्‍या रेडीएशनमुळे होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

close