गडचिरोलीत पोलीस भरतीत स्थानिकांना डावलले

June 11, 2010 2:20 PM0 commentsViews: 80

11 जून

गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीत स्थानिक आदिवासी तरुणांना डावलण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या पोलीस भरती सुरू आहे.

नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी 1 हजार 240 पदांची भर्ती होत आहे. त्यासाठी 40 हजारांहून अधिक तरूण राज्यभरातून आले होते. नक्षलवाद्यांच्या धमकीला न जुमानता स्थानिक आदिवासी तरुणही मोठ्या संख्येने भरतीत सहभागी झाले होते.

नक्षलवादाचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस भरतीत स्थानिक आदिवासी तरूणांचा 80 टक्के सहभाग केला जाईल, असे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले होते. तरीही स्थानिकांना डावलून पश्चिम महाराष्ट्रातील तरूणांना संधी दिल्याचा आरोप येथील आदिवासी तरुणांनी केला.

या भरतीविरोधात स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच या पोलीस भरतीला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी कोर्टातही धाव घेतली आहे.

दरम्यान, गडचिरोली इथे संतप्त युवकांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या वाहनांचा ताफा रोखला. या युवकांनी आर. आर. यांना या भरतीसंदर्भात तक्रारीचे निवेदन दिले

close