बेपत्ता मुलीचा शोध सुरू

June 11, 2010 2:34 PM0 commentsViews: 2

11 जून

मुंबईतील कुर्ला नेहरूनगर भागात सध्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या भागातून गेल्या तीन महिन्यांपासून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस तक्रारींकडे लक्ष देत नसल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.

'आयबीएन-लोकमत'ने दोन दिवसांपासून हा मुद्दा लावून धरला. तसेच पोलिसांची अकार्यक्षमता उघड केली. अखेर पोलिसांना आता जाग आली आहे. सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नुसरत शेख या मुलीच्या शोधासाठी आता पोलीस कामाला लागले आहेत.

पोलिसांनी ठिकठिकाणी जनजागृती करण्यासाठी बॅनर्स लावले आहेत. तर संशयीत आरोपीचे स्केचही अनेक भागात लावण्यात आले आहे. आधीच्या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी आत्तापर्यंत 55 जणांच्या डीएनए टेस्ट केल्या आहेत. कुर्ला नेहरूनगर भागात आता 22 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

या भागातील सर्व अश्लील सिनेमा दाखवणारी सिनेमागृहे बंद करण्यात आली आहेत. तसेच या भागातील लहान मुलांसाठी काम करणार्‍या 12 सामाजिक संस्थांची मदतही यासाठी घेतली जात आहे. पोलिसांच्या 12 टीम या प्रकरणातील आरोपींच्या मागावर आहेत

close