मुंबईत पाणीकपात कायम

June 11, 2010 2:42 PM0 commentsViews:

11 जून

मान्सून दाखल झाला असला तरीही मुंबईकरांना पाणीकपात सहन करावी लागणार आहे. येत्या 15 जुलैपर्यंत 15 टक्के पाणी कपात कायम राहील, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

मुंबईत पाणी पुरवठा करणार्‍या तलावक्षेत्रांमध्ये आतापर्यंत 30 ते 50 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पण 15 जुलैपर्यंत 15 टक्के पाणीकपात सुरू राहणार आहे. सध्या धरणांमध्ये 80 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. हा साठा मुंबईला जुलैपर्यंत पुरणार आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावक्षेत्रांमध्ये आतापर्यंत किती पाऊस झाला त्यावर एक नजर टाकूया….

अप्परवैतरणा- 64 मिमी

तानसा- 38 मिमी

विहार- 59 मिमी

मोडकसागर- 42 मिमी

तुलसी-37 मिमी

भातसा- 65 मिमी

close