पवनऊर्जेसाठी झाडांची कत्तल

June 11, 2010 3:13 PM0 commentsViews: 7

11 जून

पुणे जिल्ह्यातील खेड आणि मावळ तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांत पवनउर्जा प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल केली जात आहे.

हा प्रकल्प इनरकॉन इंडिया लिमिटेड ही कंपनी उभारत आहे. स्थानिक लोकांनी याला विरोध करूनही झाडांची कत्तल सुरूच आहे.

सह्याद्रीच्या या डोंगररांगावर सुमारे 800 कोटींचा हा पवन उर्जा प्रकल्प उभारला जात आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाला 10 डिसेंबर 2009ला परवानगी दिली आहे.

स्थानिकांना मात्र याबाबत कोणतीच कल्पना नाही. झाडांची कत्तल केली जाऊ नये, अशी स्थानिकांची मागणी आहे.

close