मिकी पाशेकोंच्या घरावर छापा

June 11, 2010 3:24 PM0 commentsViews: 3

11 जून

मैत्रिणीच्या मृत्यूप्रकरणात वादात सापडलेले गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेकोंपुढील अडचणी वाढताना दिसत आहेत.

नादिया टोरॅडो या मैत्रिणीच्या गूढ मृत्यू प्रकरणी पाशेकोंच्या मारगोवमधील घरावर आज छापा टाकण्यात आला.

त्यांचा काँप्युटर आणि घरात सापडलेली कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली.

फरार असलेल्या पाशेकोंवर नादियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आज पाशेकोंचा सहाय्यक लिंडोन मोंटेरो याला सुद्धा फरार घोषित करण्यात आले आहे.

close