पुण्यात कारमध्ये मृतदेह आढळला

June 12, 2010 10:35 AM0 commentsViews: 4

12 जून

पुणे येथील दांडेकर पुलाजवळ मारूति कारमध्ये एक मृतदेह आढळला आहे. ही कार या भागात चार दिवसांपासून उभी होती.

कारच्या आतून येणार्‍या दुर्गंधीमुळे नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांना कारमध्ये एका पुरूषाचा मृतदेह आढळला.

कारमध्ये सापडलेल्या पॅनकार्ड आणि लायसन्सवरून मृत्यू पावलेला व्यक्तीचे नाव अशोक घोलप असल्याचे समजते.

प्राथमिक तपासात ही खुनाची घटना असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत्यू पावलेली व्यक्ती ही फर्निचर व्यावसायीक असल्याची माहिती मिळत आहे.

close