इंग्लंड-अमेरिका आमने-सामने

June 12, 2010 1:16 PM0 commentsViews: 1

12 जून

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये आज इंग्लंड आणि अमेरिका यांच्यात लीग मॅच होणार आहे.

रुस्टेनबर्गमधील रॉयल बॅफोकेंग स्टेडियमवर होणार्‍या या मॅचसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी दक्षिण आफ्रिकन पोलिसांनी स्टेडियम बंद केले आहे. त्याचबरोबर स्टेडियमच्या आतमध्ये आणि सभोवती पोलिसांसोबतच लष्कराची हेलिकॉप्टर्सही कडेकोट नजर ठेवून आहेत.

स्टेडियमच्या सभोवतालच्या भागात फिरणार्‍या नागरिकांचीही तपासणी करण्यात येत आहे. फिफा वर्ल्डकप आयोजकांपुढे या स्पर्धेदरम्यान सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे.

आणि इंग्लंड -अमेरिकेदरम्यानच्या मॅचसाठी तर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

close