उर्जा प्रकल्पाच्या विरोधासाठी मुलांची शाळा बंद

June 12, 2010 1:30 PM0 commentsViews: 5

12 जून

तळेगावातील हिरानंदानी उर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गावकर्‍यांचा अनोखे आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुलांना शाळेतच न पाठवण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला आहे.

गावकर्‍यांच्या विरोधाला न जुमानता नवखांब उंबरे इथे या प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. ही सरकारची दडपशाही असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.

या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होऊन परिसरातील आरोग्य धोक्यात येईल, असे आंदोलकाचे म्हणणे आहे.

या आंदोलनानंतरही सरकार ताळ्यावर येत नसल्यास, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा गावकर्‍यांनी दिला आहे.

close