बागवानला पोलीस कोठडी

June 14, 2010 10:25 AM0 commentsViews: 2

14 जून

सांगली – मिरज दंगल प्रकरणातील आरोपी आणि सांगलीचा माजी महापौर मैनुद्दीन बागवान याला 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले. 'आयबीएन-लोकमत'च्या पाठपुराव्यानंतर फरार असलेल्या बागवानने काल स्वत: सांगली पोलिसांपुढे शरणागती पत्करली होती. त्यानंतर त्याला मिरज पोलिसांनी अटक केली.

निर्दोष असल्यामुळेच आपण पोलिसांपुढे हजर झाल्याचे बागवानचे म्हणणे आहे.

…तर कारवाई करू

राष्ट्रवादी पक्ष गुन्हेगारांना पाठीशी घालणारा पक्ष नाही. त्यामुळे बागवान दोषी आढळला, तर त्याच्यावर कारवाई करू असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी दिले आहे.

close