आज नेदरलँड आणि डेन्मार्कमध्ये झुंज

June 14, 2010 11:33 AM0 commentsViews: 3

14 जून

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये आज ग्रुप ईच्या मॅच खेळवल्या जातील. यातील पहिली मॅच असेल, ती नेदरलँड आणि डेन्मार्कदरम्यान. ग्रुप ईमध्ये नेदरलँडच्या टीमकडे संभाव्य विजेती टीम म्हणून पाहिले जाते.

सुरुवातीपासूनच आक्रमण करत गोल करण्यासाठी ही टीम नेहमीच उत्सुक असते. पण त्यांना डेन्मार्कविरुध्दची मॅच फारशी सोपी नसणार आहे. डेन्मार्कने स्वीडनवर मात करत मुख्य स्पर्धेत प्रवेश केला आहे. या टीममध्येही अनुभवी खेळांडूचा भरणा आहे.

जपान-कॅमेरून आमने-सामने

यानंतर दुसरी मॅच असेल ती जपान आणि कॅमेरुनमध्ये. जपानची ही चौथी वर्ल्डकप स्पर्धा आहे. जपानच्या टीमने 1992, 2000 आणि 2004मध्ये आशियाई स्पर्धा जिंकली आहे. पण वर्ल्डकप स्पर्धेत त्यांना अशी कामगिरी एकदाही करता आलेली नाही.

पण आता हा चमत्कार घडवण्यासाठी कोच ताकेशा ओकादा युवा खेळाडूंची टीम घेऊन दक्षिण आफ्रिकेत दाखल झालेत. पण सध्या तरी या मॅचमध्ये कॅमेरूनचे पारडे जड आहे. कॅमेरूनची टीम धक्कादायक कामगिरी करण्यासाठी प्रसिध्द आहे. सॅम्युएल एटो हा अनुभवी खेळाडू कॅमेरूनचे नेतृत्व करत आहे. त्याला आक्रमक खेळ करणार्‍या एमाना, वेबो यांची साथ लाभणार आहे.

इटलीचा मुकाबला पेरुग्वेशी

ग्रुप एफमध्ये गतविजेत्या इटलीचा मुकाबला असेल तो पेरुग्वेशी. रात्री बारा वाजता ही मॅच खेळवली जाईल. 2006मध्ये इटलीने फुटबॉल वर्ल्डकपवर आपले नाव कोरले होते. त्याच टीममधील बरेचसे खेळाडू या वर्ल्डकपमध्येही खेळत आहेत.

कॅनावारो, शिलिनी, झॅम्ब्रोटा अशा जबरदस्त अनुभवी खेळाडूंवर इटलीची मदार आहे. दुसरीकडे पॅराग्वे टीममध्येही दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. पण बचावात ते कमी पडतात. त्यामुळे या मॅचमध्ये इटली फेव्हरेट असणार आहे.

close