मराठवाडयात पावसाचे 18 बळी

June 14, 2010 12:39 PM0 commentsViews: 2

14 जून

मराठवाड्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. गेल्या तीन दिवसात वादळी वार्‍यासह सुरू असलेल्या पावसाने 18 जणांचा बळी घेतला आहे.

पावसाचा जोर कमी आहे. पण विजा आणि सोसाट्याच्या वार्‍याने जास्त नुकसान केले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. त्यामुळे वाहतुकीतही अडथळे निर्माण झाले आहेत.

शेंद्रा एमआयडीसीत सोसाट्याच्या वार्‍यात सापडून रस्त्याकडेला उभे असलेले 10 ट्रक उलटले आहेत.

खान्देशात नुकसान

खान्देशातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.मनमाड शहरात काल रात्रभर झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली. पोल्ट्री आणि कांदा उत्पादकांचे यात मोठे नुकसान झाले आहे.

कोकणात वीज गायब

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. लांबलेला मान्सून कोकणात दाखल झाल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतीची कामे सुरू झाली आहेत. पण या पहिल्याच पावसात अनेक भागात वीज गायब झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

मुंबईत पाऊस

मुंबईतही पावसाला सुरुवात झाली आहे. काळ्या ढगांनी आकाश व्यापून टाकले आहे. सकाळपासून मुंबईकरांना सूर्याचे दर्शन नाही. तर उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. डोंबिवलीत सकाळी जोरदार सरी बरसल्या.

close