सीईटीचा निकाल जाहीर

June 14, 2010 2:13 PM0 commentsViews: 5

14 जून

सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील 2 लाख 85 हजार 260 विद्यार्थ्यांनी या वर्षी ही परीक्षा दिली होती.

यामध्ये मुंबईच्या रुईया कॉलेजच्या अनिश बिवलकर या विद्यार्थ्याने 200 पैकी 199 गुण मिळवले आहेत.

यावर्षी सेटच्या टॉपर्सची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मेडिकलसाठी राज्यातून 33 हजार 663 विद्यार्थी बसले होते.

तर 1 लाख 5 हजार 721 विद्यार्थी इंजीनिअरिंगसाठी बसले होते.

close