झारखंडमध्ये 10 नक्षलवादी ठार

June 14, 2010 2:55 PM0 commentsViews: 6

14 जून

झारखंडमध्ये 18 तासांच्या धुमश्चक्रीनंतर सुरक्षादलांनी 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

नक्षलवाद्यांविरोधात सीआरपीएफ आणि पोलिसांच्या जॉईंट फोर्सने ही कारवाई केली आहे.

या हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवानही जखमी झाले आहेत.

वेस्ट सिंगभूमी येथील सरंगा जंगलात ही चकमक झाली. पोलिसांच्या जॉईंट फोर्सला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

close