पेट्रोल दरवाढ लांबणीवर

June 15, 2010 10:37 AM0 commentsViews: 2

15 जून

पेट्रोल-डिझेलची दरवाढ पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे.

सरकारमधीलच अंतर्गत विरोधामुळे ही दरवाढ अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.

डीएमके, तृणमूल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या दरवाढीला विरोध केला. यामुळे सरकारला दरवाढीचा निर्णय पुढे ढकलावा लागला आहे.

या महिन्यात महागाईच्या दराने 10.06 चा उच्चांक गाठला आहे. या परिस्थितीत पेट्रोल दरवाढ केली तर महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने तूर्तास तरी पेट्रोल-डिझेल दरवाढ पुढे ढकलली आहे.

close