नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून शाळा बंद

June 15, 2010 10:59 AM0 commentsViews: 5

15 जून

शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून उल्हासनगरमधली एक शाळा संस्थाचालकांनी बंद केली आहे.

उल्हासनगरच्या होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये वशिल्यावर प्रवेश मिळावा यासाठी शिवसेनेचे स्थानिक नगरसवेक शाळेवर वारंवार दबाव आणत होते.

शिक्षण विभाग आणि मनपाचे अधिकारीही शाळेवर प्रवेशासाठी वारंवार दबाव आणतात, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली.

दहावीचा शंभर टक्के निकाल लागणार्‍या या शाळेच्या प्रशासनाने अखेर ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शाळेतील अडीच हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

तर आपल्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक रमेश चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

close