नाले बुजवल्याचा पुणेकरांना फटका

June 15, 2010 11:20 AM0 commentsViews: 2

15 जून

पुण्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. अनेक वस्त्यांत, सोसायट्यांमध्ये पाणी घुसले.

बिल्डर्सने नैसर्गिक नाले वळवल्याने, बुजवल्याने तसेच महापालिकेने याकडे डोळेझाक केल्याने त्याचा फटका बसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वकीलनगर सोसायटीत 25 घरांमध्ये पाणी घुसले. 100 हून अधिक वाहने पाण्यात बुडाली. नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलणे, नाल्यावर बांधकाम करणे, राडारोडा टाकून नाला बुजवणे यामुळेच घरात पाणी घुसण्याचे प्रकार घडत आहेत.

या विरोधात नागरिक आणि कार्यकर्ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत

close