बागवानच्या पीएला अटक

June 15, 2010 11:32 AM0 commentsViews: 3

15 जून

मिरज दंगलीचा मुख्य सूत्रधार मैनुद्दीन बागवानला अटक करण्यात आली आहे.

आता मिरज दंगलीतील आरोपींना रसद पुरवल्याच्या कारणावरुन मैनुद्दीन बागवानचा पीए मुन्ना सय्यद याला मिरज पोलिसांनी अटक केली आहे.

सय्यद याने बागवानच्या सांगण्यावरून शाहीद बेपारी आणि इम्रान नदाफला रसद पुरवली होती. त्यामुळे मिरज पोलिसांनी त्याला अटक केली.

सय्यदला दुपारी दोनच्या सुमारास मिरज येथील कोर्टात हजर करणार आहेत.

'बागवानला पाठीशी घालत नाही'

मिरज-सांगली दंगलीतील संशयीत मैनुद्दीन बागवान याला आपण पाठीशी घालत नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

हा गैरसमज प्रसारमाध्यमांनीच पसरवल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

close