ग्रुप ‘एफ’ आणि ‘जी’मध्ये आज लढत

June 15, 2010 12:11 PM0 commentsViews: 6

15 जून

वर्ल्डकपमध्ये आज ग्रुप एफ आणि ग्रुप जीमधल्या लढती रंगतील. ग्रुप एफमध्ये पहिली लढत असेल ती न्यूझीलंड आणि स्लोव्हाकियादरम्यान. संध्याकाळी पाच वाजता ही मॅच रंगेल.

या मॅचमध्ये स्लोवाकियाच्या टीमला विजयाची पसंती देण्यात आली आहे. त्यांच्या टीममध्ये चांगले आक्रमक खेळाडूच नव्हे तर चांगले फिनिशरही आहेत. चेक प्रजासत्ताक आणि रशियाला हरवत स्लोव्हाकियाने वर्ल्डकपमध्ये धडक मारली आहे. न्यूझीलंडची टीम त्यामानाने नवखी आहे. पण वर्ल्डकपमध्ये खेळत असल्याने त्यांचा उत्साही जबरदस्त आहे.

ग्रुप जीमध्ये दोन मॅच

यानंतर या स्पर्धेत सर्वात टफ ग्रुप म्हणून पाहिल्या जाणार्‍या ग्रुप जीमधील दोन मॅच खेळवल्या जातील. यातील पहिली मॅच असेल ती पोर्तुगाल आणि आयव्हरी कोस्ट दरम्यान. स्पर्धेतील एक जबरदस्त टफ मॅच म्हणून या मॅचकडे पाहिले जात आहे. पोर्तुगाल टीममध्ये नॅनी नसला तरी ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखा सध्याचा स्टार खेळाडू या टीममध्ये आहे.

दुसरीकडे आयव्हरी कोस्टची टीम त्यांचा प्रमुख खेळाडू ड्रोगा फिट होईल अशी अपेक्षा बाळगून आहे. तो खेळू न शकल्यास त्यांच्या टीमला मोठा फटका बसणार आहे.

ब्राझील आणि उ. कोरिया आमने-सामने

तर दुसरी मॅच असेल वर्ल्डकपमध्ये पाचवेळा जेतेपद पटकावलेल्या बलाढ्य ब्राझील आणि उत्तर कोरियादरम्यान. आणि या मॅचमध्ये ब्राझील जिंकणार का, यापेक्षा ब्राझीलची टीम किती गोलने जिंकणार याचीच उत्सुकता फुटबॉल फॅन्सना लागली आहे. कोच कार्लोस डुंगा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या ब्राझीलच्या टीममध्ये काका, रॉबिन्हो, लुईस फॅबिनो, मैकॉन असे दर्जेदार खेळाडू आहेत.

डुंगा यांनी कोचपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून ब्राझीलने 55 मॅचपैकी केवळ चार पराभव स्वीकारले आहेत. उत्तर कोरियाचा मुकाबला या बलाढ्य टीमशी असला तरी कोच किम जाँग हून यांनी चांगली लढत देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. उत्तर कोरिया तब्बल 44 वर्षांनी वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे. याआधी ही टीम 1966मध्ये वर्ल्डकप स्पर्धेत खेळली होती.

close