सचिनचे स्वप्न वर्ल्ड कप जिंकण्याचे

June 15, 2010 2:08 PM0 commentsViews: 1

15 जून

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर टेस्ट आणि वन डे क्रिकेटमधील सगळे रेकॉर्ड जमा आहेत. पण अजून त्याची एक इच्छा अपूर्ण आहे. ती म्हणजे भारतीय टीमने वन डे वर्ल्डकप जिंकण्याची…

सचिन सध्या ऑल इंग्लंड क्लबच्या निमंत्रणावरून विम्बल्डन बघण्यासाठी लंडनला आला आहे. पण इथेही त्याच्या मनात वर्ल्डकप स्पर्धेचेच विचार घोळत आहेत. क्रिक इन्फो या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सचिनने वर्ल्डकप जिंकण्याचे आपले स्वप्न पुन्हा एकदा बोलून दाखवले आहे.

वर्ल्डकप जिंकणे ही एक प्रक्रिया आहे. तुम्ही थेट पन्नासाव्या मजल्यावर नाही उडी मारू शकत. तुम्हाला तळ मजल्यावरूनच सुरुवात करायला हवी. पण तळमजल्यापासून वरचा प्रवास हा एक न विसरण्यासारखा अनुभव असेल. वर्ल्डकप जिंकणं हे माझ्या एकट्याचे स्वप्न नाही. तर करोडो भारतीय माझ्याबरोबर हेच स्वप्न बघत आहेत. याची जाणीव मला आहे, असे सचिन म्हणाला.

सध्याच्या टीमचे सचिनने कौतुक केले आहे. आताची टीम बघितली तर वर्ल्डकप फायनल गाठणे मला कठीण वाटत नाही. फक्त सगळ्यांनी गुणवत्तेनुसार खेळ करायला हवा, असे सचिनला वाटत आहे.

close