आण्विक अपघाताची जबाबदारी पुरवठादारांवर

June 15, 2010 5:27 PM0 commentsViews: 3

15 जून

भोपाळ गॅस दुर्घटनेच्या निकालाने निराशा केली असली, तरी त्यातून धडा घेत एक नवा मुद्दा समोर आला आहे. भविष्यात आण्विक अपघात झाला, तर त्याची जबाबदारी पुरवठा करणार्‍या परदेशी कंपन्यांवरही राहणार आहे.

न्यूक्लियर बिलातील परदेशी कंपन्यांची जबाबदारी कमी करणारे कलम आता केंद्र सरकारने रद्द केले आहे. विरोधक आणि संसदीय मंडळाच्या दबावानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत अमेरिका अणुकरारानंतर उभ्या राहणार्‍या अणुभट्‌ट्यांमध्ये अपघात झाला तर त्याची जास्तीत जास्त जबाबदारी भारतीय ऑपरेटरवर ठेवण्यात आली होती. या विषयावर न्यूक्लियर पॅनलची बैठक झाली.

त्यात पुरवठा करणार्‍या अमेरिकन कंपन्या अपघाताची जबाबदारी झटकू शकत नाहीत, असे एकमताने ठरवण्यात आले. तसेच अमेरिकन कंपन्यांची जबाबदारी कमी करणार्‍या सरकारच्या प्रस्तावाचा कडाडून विरोधही करण्यात आला.

close