मनसेकडून नाल्यांची पाहणी

June 15, 2010 5:36 PM0 commentsViews: 2

15 जून

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेनं केला होता. पण पाऊस सुरू झाल्यानंतर हा दावा पहिल्याच पावसात वाहून गेल्याचा आरोप मनसेने केला आहे.

मनसेचे आमदार आणि नगरसेवक मंगेश सांगळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या सात नगरसवेकांनीआज मानखुर्द, भांडुप, विक्रोळी, वांद्रे, गोवंडी शिवाजीनगर आणि माहीम भागांमध्ये जाऊन नाल्यांची पहाणी केली. इथे नालेसफाईच झाली नसल्याचे यावेळी दिसून आले.

अनेक नाले गाळामुळे तुंबले आहेत. तर काही ठिकाणी गाळच उचलण्यात आलेला नाही.

close