कोकण, कोल्हापुरात पाऊस

June 16, 2010 9:51 AM0 commentsViews: 4

16 जून

कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यामध्ये 443 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस 104 मिलीमीटरची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली. धरणक्षेत्रामध्ये चांगला पाऊस झालेला आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम आहे. कोयना धरणाच्या पाणी पातळीत 6 इंचाने वाढ झाली आहे.

कोकणात जोरदार पाऊस

कोकणातही जोरदार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 48 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आता थोडा कमी झाला आहे.

रायगडला झोडपले

रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रायगडला चांगलेच झोडपले आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 54.24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मुरुड येथे झाला. या परिसरात 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पोलादपूर इथे 80 तर माथेरानमध्ये 75 मिलीमीटर पाऊस पडला.

कर्जतमध्ये 74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान कोलाड पुणे मार्गावर ताम्हाणी भागात दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुसळधार पावसाचा अंदाज

येत्या 48 तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. वेधशाळेचे उपमहासंचालक ए. बी. मजुमदार यांनी ही माहिती दिली आहे.

कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने मुसळधार पाऊस होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच विदर्भाचा काही भाग वगळता महाराष्ट्राच्या सर्व भागात मान्सून पोहोचला असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

close