कोकण रेल्वेच्या विरोधात राणे करणार आंदोलन

June 16, 2010 10:58 AM0 commentsViews: 4

16 जून

कोकण रेल्वेच्या विरोधात महसूलमंत्री नारायण राणेंच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.

कोकण रेल्वेच्या प्रत्येक गाडीचा थांबा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एका स्टेशनवर हवा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

राणे कोकण रेल्वेच्या विरोधात चक्का जाम करणार आहेत.

सावंतवाडी ते मुंबई अशी रेल्वेसेवा तातडीने सुरू करावी, सावंतवाडी इथे रेल्वे स्टेशन सुरू करावे, कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या मिळाव्यात, रेल्वे स्टेशनवर फ्लायओव्हर बनवावेत, या नारायण राणेंच्या प्रमुख मागण्या आहेत.

राणेंच्या या मागण्यांना अर्थमंत्री सुनिल तटकरे यांनीही पाठींबा दर्शवला आहे.

close