सायन हॉस्पिटलमधील नर्सेसचा संप

June 16, 2010 12:06 PM0 commentsViews: 2

16 जून

सायन हॉस्पिटलमधील नर्सेस आणि कामगारांनी आज सकाळपासून संप पुकारला होता. आता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

कर्मचार्‍यांना पदोन्नती द्यावी, तसेच कामगारांची संख्या वाढवावी, अशा या नर्सेसच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत.

या कामबंद आंदोलनात नर्सेस, वॉर्ड बॉईज आणि इतर कर्मचार्‍यांचा सहभाग होता. हॉस्पिटलच्या डीन संध्या कामत यांच्या मनमानी कारभाराविरोधात हे आंदोलन करण्यात आले होते.

close